औरंंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून चुलत भावाच्या पत्नीवर वांरवार बलत्कार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी भायाला गजाआड केले असून त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी गुरुवारी दिले आहेत.
प्रकरणात २७ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानूसार, मार्च २०२० मध्ये फिर्यादी ही पती व मुलांसह चुलत भाया राहत असलेल्या परिसरात राहण्यासाठी आली होती. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. काही दिवसांनी आरोपी हा फिर्यादीच्या घरी आला व त्याने फिर्यादीला लग्?नाची मागणी घातली, मात्र तिने नकार दिला. तेंव्हा आरोपीने फिर्यादीवर बळजबरी बलात्कार केला आणि तु माझी झाली नाही तर तुझ्या नव-याला मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीवर वांरवार बलात्कार केला.
४ ऑक्टोबर २०२० रोजी फिर्यादीचा पती हा मुलांसह घर सोडून निघुन गेला. ही बाब फिर्यादीने आरोपीला सांगितली, व फिर्यादीही आरोपीच्या घरी राहण्यासाठी गेली. त्यावेळी देखील आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. दुस-या दिवशी फिर्यादी सेलू (परभणी) येथे माहेरी निघुन गेली. ऑक्टोबर २०२० फिर्यादीच्या पतीने फारकती नोटीस पाठवली. तेंव्हा फिर्यादीने वडीलांना आरोपीशी लग्न करणार असल्याचे सांगितले.
२ मार्च रोजी आरोपीने फिर्यादीला फोन करुन घ्यायला येणार असल्याचे सांगितले. त्यानूसार फिर्यादी सेलू येथुन औरंगाबादला आली. त्यानंतर आरोपीने तिला पुणे, बीड आणि औरंगाबादला फिरवले. ४ मार्च रोजी आरोपीने फिर्यादीला एका रुमवर नेवून पुन्हा बलात्कार केला. व ५ मार्च रोजी लग्न करण्यास नकार दिला. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

