अहमदनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी प्रांत कार्यालयासमोर भाजपने आंदोलन केले. आंदोलनात राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पोलिसांना पुढे करून सरकारने राज्यात एक प्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला.
आ.विखे पाटील म्हणाले की, मंत्री राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. यापूर्वी भाजपच्या नेत्यांवर शिवसेनेकडून अतिशय खालच्या स्तरावर जावून टीका केली गेली. त्यावेळी पोलिसांना कायदा आठवला नाही. आज पर्यंतच्या झालेल्या दसरा मेळाव्यातील शिवसेना नेत्यांची वक्तव्यही पोलिस प्रशासनने दुर्लक्षित केली, मग पोलिसांना कायद्याचा साक्षात्कार आताच कसा झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘पोलिस बळाचा वापर करून राज्यात सरकारने निर्माण केलेले वातावरण आणि दहशत अतिशय दुर्दैवी असून,भाजप कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर झालेले हल्लेसुद्धा सरकार पुरस्कृत आहे. जेव्हा जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? हा सामान्य माणसात दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. याचा आम्ही निषेध करतो. शेवटी कायदा शिल्लक आहे, हे कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल. महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळं सरकार तोंडावर पडलंय. न्यायालयाने सरकारच्या एक प्रकारे कानशिलात लगावलीय’ अशी टीका राधाकृष्ण विखे यांनी केलीय.
महत्त्वाच्या बातम्या
- सर्व गुन्हे रद्द करण्यासाठी नारायण राणे हायकोर्टाची पायरी चढणार
- ‘अशा धमक्यांना मी घाबरत नाही, जशास तसं उत्तर देईन!’- प्रसाद लाड
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

