मुंबई : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना पोलिसांनी काल २४ ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर नारायण राणेंना रत्नागिरीतील गोळवली येथून महाड येथे आणण्यात आले. रात्रीच्या सुमारास महाड न्यायालयात नारायण राणेंना हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर नारायण राणेंना सशर्त जामीन मंजूर केला. राणे यांच्यावर महाडसह पुणे, नाशिक, आणि ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आणखीन अडचणी उभ्या राहण्याच्या शक्यता आहेत.
या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सकाळीच वकिलांची एक टीम राणेंच्या घरी आली होती. या वकिलांनी नारायण राणे यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. राणेंचे वकील आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राणेंवरील सर्व खटले रद्द करण्याची मागणी करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
अॅड. अनिकेत निकम व त्यांचे सहकारी राणेंच्या घरी आले होते. कालच्या याचिकेत राणेंची सही नव्हती. त्यामुळे त्यांची सही घेऊन आज पुन्हा नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे. राणेंविरोधात पुणे, नाशिक, महाड आणि ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पुर्तता करून वकिलांची टीम बाहेर पडली. परंतू बाहेर जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधायला नकार दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटावर केआरकेची टीका, म्हणाला…
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा

