Share

‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: गुजरात उच्च न्यायालयाचा हीरक महोत्सव कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे तो या कारणामुळे की, या कार्यक्रमात न्यायाधीशांनी मोदींवर आणि मोदींनी न्यायालयावर उधळलेल्या स्तुतिसुमनांमुळे यावर आजच्या सामना अग्रलेखातून सरकारवर तोफ डागत न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या कार्यक्रमात न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी पंतप्रधान मोदी यांच कौतुक केल होत तर पंतप्रधान मोदी यांनी देखिल देशातील न्यायव्यवस्था योग्य न्याय देण्याचे काम करत असल्याच म्हणत जणू त्या कौतुकाची त्यांनी लगेच परतफेड करून टाकली. मात्र न्यायव्यवस्थेच्या अशा सरकारच्या बाजूने असणे नेहमीच पक्षपात होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे यावर आज शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे.

‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर गाडी, घोडा, बंगल्याची सोय व्हावी म्हणून आधीपासूनच खुंटा बळकट करीत असतात व त्यापैकी अनेकांना त्याचे फळ मिळत असते. एखाद्या राज्याचे राज्यपालपद तर गेलाबाजार कुठेच गेले नाही. माजी मुख्य न्यायाधीश श्री. रंजन गोगोई सध्या सरकारी कृपेने राज्यसभेचे सदस्य आहेत. स्वायत्त न्यायसंस्था हे कोणत्याही प्रजासत्ताकाचे हृदय असते. या महान यंत्रणेवरच लोकशाहीचा मूलाधार, तिच्या शाश्वताच्या सामर्थ्याचा स्रोत, तिच्या विकासाला अनुकूल ठरणारी परिस्थिती आणि तिच्या सुरक्षिततेची आशा… सारे काही अवलंबून असते असे नानी पालखीवाला यांनी एका व्याख्यानात सांगितले होते.’ अशी टीका आजच्या सामना अग्रलेखातून न्यायव्यवस्थेवर करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!