Share

“पंतने आपला नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे, त्यात कोणताही बदल करु नये”

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मध्ये भारतीय संघाला आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून देणाऱ्या रिषभ पंत याचा बोलबाला इंग्लंड संघाविरुद्धही दिसून आला. रिषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ताबडतोड फलंदाजी केली. त्याने सहाव्या क्रमांकावर येऊन, संघ संकटात असताना अवघ्या ४० चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, ‘पंतने आपल्या नैसर्गिक खेळ खेळणे सुरुच ठेवावे आणि त्यात कोणताही बदल करु नये. मात्र हे करत असताना त्याने परिस्थिती ओळखून संघाच्या हितासाठी फटक्यांची योग्य निवड करुन खेळले पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने दिली.

भारतीय संघाने ७९ धावांत ४ बळी गमावल्यानंतर पुजारा-पंत यांनी पाचव्या गड्यासाठी ११९ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. पुजाराने म्हटले की, ‘आक्रमकता पंतचा नैसर्गिक खेळ आहे. त्यामुळे आम्ही त्याला फारवेळ रोखू शकत नाही. तो फार बचावात्मक नाही खेळू शकत, कारण यामुळे कदाचित तो लवकर बाद होईल. त्याने आक्रमक फटके खेळत राहणे, हे त्याच्यासाठी चांगलेच आहे. परंतु, हे करत असताना त्याने विचार करुन फटक्यांची निवड करावी.’

पुजार पुढे म्हणाला की, ‘पंतसारखे गुणवान खेळाडू आपल्या चुकांमधून नक्कीच शिकतील. पंतही यातून शिकेल. कोणता फटका कधी खेळावा, हे त्याने शिकले पाहिजे. परिस्थितीनुसार त्याची खेळपट्टीवर कधी गरज लागणार, हे पंतने समजून घ्यायला हवे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!