मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजप, मनसेने याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. पोलिस बंदोबस्त असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठिकठिकाणी रात्री, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडल्या आहेत.
तर आता या पार्श्वभूमीवर सनातन धर्म लाखो वर्षांपासूनचा आहे. आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपने घेतली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. भाजप नेते आणि आमदार राम कदम ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
‘दहीहंडी साजरी करू नये, म्हणून ठाकरे सरकारने शेकडो पोलिसांना माझ्या घरी पाठवले! हिंदू धर्म हज़ारो वर्षांचा नाही तर लाखों वर्षांचा आहे, म्हणूनच आपण त्याला सनातन धर्म म्हणतो. आम्ही परंपरा खंडित होऊ देणार नाही. तांडव वेब सीरीज मधे हिंदू देवी देवताना शिव्या दिले जातात, अटक नाही, शर्जील महाराष्ट्राच्या भूमि मधे येऊन हिंदुना सडक्या म्हणून जातो, त्याला अटक नाही.
पण जर हिंदुने आपल्या पारंपारिक पद्धतीने गर्दी न करता सण साजरा केला तर त्यांना अटक करण्यात येईल. त्यामुळे आता कायद्याचे राज्य महाराष्ट्रात आहे का हे आता देश ठरवेल.’ असे ठाम मत राम कदम यांनी व्यक्त केले आहे. तसेच याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘जेव्हा अन्य धर्माच्या लोकांनी ठाकरे सरकारला सण साजरा करण्यासाठी परवानगी मागितली.
कोणती अशी कारणे होती की अर्ध्या रात्री मंत्रालय उघडल्या गेले. आम्ही तर केवळ सांगतोय की पाच जणांना परवानगी द्या. पाच जणांच्या वर एकही व्यक्ती येणार नाही. ते पाचही जण सरकारला दोन्ही लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र दाखवतील. सहावा व्यक्ती जर आला तर तुम्ही आम्हाला बोला,’ असे राम कदम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रिमोट ही आमची वडिलोपार्जित देणगी, हातातला रिमोट आम्ही सोडत नाही’
- सचिन पिळगावकर यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा उर्दूत दिल्याने सोशल मीडियावर ट्रोल
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘घंटानाद करा, नाहीतर काहीही करा, पण आमचा नाद करू नका’, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला
- ‘हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे आंदोलन नाही’, ठाकरेंचा मनसे, भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

