नाशिक : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून एकामागे एक गंभीर आरोप करत असून त्यांनी विविध प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, शिवसेना खासदार भावना गवळी आदींसह एकूण ११ जणांवर गंभीर आरोप करत ईडी, सीबीआय चौकशीची मागणी करण्यासह किरीट सोमय्या यांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान, आता किरीट सोमय्या यांनी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी ईडीच्या यादीतील १२ व्या व्यक्तीचे नाव जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सोमय्या यांचे पुढील टार्गेट असल्याचं आता जाहीर झालंय. किरीट सोमय्या यांनी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ईडीच्या लिस्टमधील १२ वं नाव त्यांनी जाहीर केलंय. ‘लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे,’ असं म्हणत चेहऱ्यावर हास्य आणून अधिक बोलणं टाळलं. त्यामुळे आता आदींची नोटीस आव्हाडांना येणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष्य लागलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘रामाची नियत खराब होती जयकुमार गोरेची चांगली आहे’ ; भाजप आमदारचे वादग्रस्त विधान
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘मी त्या जागी योग्य नाही’ असे सांगत बांगलादेशच्या महान सलामीवीराने टी -20 विश्वचषकातून घेतली माघार
- ‘…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो’; फडणवीसांच महत्वाचं विधान
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत


