मुंबई : भाजपचे आमदार जयकुमार गोरे त्यांच्या एका चुकीच्या विधानामुळे चांगलेच वादाच्या भोवर्यात सापडलेले आहेत. तसेच प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तीचे दाखले देवून सातत्याने विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपला देखील त्यांनी त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत आणले आहे.
एका कार्यक्रमात राजकीय जय पराजयाबाबत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी रामायणातील दाखला दिला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना गोरे म्हणाले कि, ‘लढाईत रामाने रावणाला हरवले. रावण अखेरच्या घटका मोजत होता. तेव्हा रावणाने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी सेना आहे. एवढी ताकद आहे. एवढे राक्षस आहेत. तुझ्याकडे तर फक्त वानरे आहेत. तरीही तू जिंकलास कसा. त्यावर राम म्हणाला, माझ्याकडे तुझा भाऊ बिभीषण होता. म्हणून लढाई जिंकलो, असे सांगून आमदार गोरे म्हणाले, माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो आहे.
कारण रामाची नियत खराब होती. रामाची नियत खराब होती.’ आमदार गोरे असे दोन वेळा म्हणताच झालेली चूक श्रोत्यांनी त्यांच्या लक्षात आणून देत रामाची नव्हे रावणाची नियत खराब होती, असा गलका श्रोत्यांनी करताच गोरेंनी रावणाची नियत खराब होती, अशी चुकीची दुरुस्ती केली.
परंतु आता कॉंग्रेसने भाजपवर आणि आमदार जयकुमार गोरेंवर चांगलेच टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे नेते व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत गोरेंवर टीका केली आहे. ‘भाजपा व फडणवीसांचे लाडके आमदार जयकुमार गोरे म्हणाले की आदर्श पुरुष असलेल्या भगवान श्रीरामांची नीयत खराब होती. त्यांच्याकडे बिभीषण असल्याने ते जिंकले.
भाजपा व फडणवीसांचे लाडके आमदार जयकुमार गोरे म्हणाले की आदर्श पुरुष असलेल्या भगवान श्रीरामांची नीयत खराब होती. त्यांच्याकडे बिभीषण असल्याने ते जिंकले.
भगवान श्रीरामांच्या नावाने लिचिंग चे समर्थन करणारी भाजपा आता रामाच्या चारित्र्याचे ही लिंचिंग करत आहे. pic.twitter.com/el5c1YAsBC— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2021
भगवान श्रीरामांच्या नावाने लिचिंग चे समर्थन करणारी भाजपा आता रामाच्या चारित्र्याचे ही लिंचिंग करत आहे. बहुजनांचा आदर्श असलेल्या श्रीरामांचे चारित्र्यहननाचा प्रयत्न अगोदर मनुवाद्यांनी विषमता पसरविण्यासाठी केला. आताची मनुवादी भाजपा केवळ सत्तेसाठी रामाचे नाव वापरते. राम मंदिराच्या नावाने जमा केलेल्या पैशाचा अपाहार झाल्याची उदाहरणे आहेत. भाजपाचीच नीयत खराब आहे. हिंमत असेल तर कारवाई करा.’ असे आव्हानच त्यांनी आता भाजपला दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नये’, गृहमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष सल्ला
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

