🕒 1 min read
नवी दिल्ली : आज शुक्रवारी झालेल्या काँग्रेसच्या संसदीय बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. देशाच्या प्रमुख राजकीय नेत्यांना जनतेविषयी कसलीही सहानुभूती नसल्याने केंद्र सरकारने जनतेला अपयशी ठरवले असल्याचेही त्या म्हणाल्या. पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरिसंगद्वारे त्यांनी संबोधित केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सोनिया गांधी म्हणाल्या, देश सध्या मोदी सरकारच्या दुर्लक्षाच्या गर्तेत बुडत चालला आहे. कोरोनाची ही परिस्थिती हाताळण्यासाठी देशाला आता सक्षम आणि द्रष्ट्या नेतृत्वाची गरज आहे. विषाणूविरुद्धची ही लढाई आता राजकीय मतभेदांच्या पलीकडे गेली आहे. त्यामुळे देशाला आता एक होऊन लढावं लागेल, असंही त्या यावेळी म्हणाल्या. कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि त्याचं उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी एक स्थायी समिती गठीत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
"I say this categorically – India is crippled by a political leadership today that has no empathy for the people. The Modi govt has failed the people of our country": Congress Interim President Sonia Gandhi at Congress Parliamentary Party Meeting, earlier today pic.twitter.com/OyQMKPfxH3
— ANI (@ANI) May 7, 2021
नुकत्याच संपलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली असून पक्षाच्या खासदारांनी यापासून प्रामाणिकपणाने काहीं धडा घेतला पाहिजे, अशी सूचना सोनियांनी केली. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक लवकरच होईल त्यात या निकालाचा आढावा घेतला जाईल.
तथापि या निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाहीं ही वस्तुस्थिती आहे. हे निराशानजनक आणि अनपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या. कॉंग्रेसला या निवडणुकीत आसाम आणि केरळात सत्ता मिळवता आली नाही. बंगालमध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. पण कॉंग्रेसने द्रमुकच्या साथीने तामिळनाडूत मात्र सत्ता संपादन केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या मुद्द्यावरून ममतांचे मोदींना सलग दोन दिवसांत दोन लेटर
- ‘मोदींकडून लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरू’, पी. चिदंबरम यांचा आरोप
- ‘कोरोनाशी लढा, मोदींसोबत नाही’, केंद्रिय मंत्र्यांचा हेमंत सोरेन यांना टोला
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल
- ‘संजय काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आलीये’, ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
