औरंगाबाद: सिल्लोड-अजिंठा रस्त्यावर सिल्लोड शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या मंगरूळ फाट्यालगत तिरुपती हॉटेलसमोर (एमएच २० -२५९५) ट्रकने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. कापसाच्या गाठी घेऊन मालमोटार लिहाखेडी येथून सिल्लोडकडे येत असताना मालमोटारीला अचानक आग लागली होती.
आगीची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. के. वाघ, पोलिस मित्र अंबादास दांडगे, कृष्णा बरडे, बालाजी बरडे हे तत्काळ मदतीसाठी धावले. वाघ यांनी तत्काळ सिल्लोड येथील अग्निशामक दलाला पाचारण करून आग विझविण्यास मदत केली. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
लिहाखेडी येथील सिद्धेश्वर जिनिंग प्रेसिंगचे मालक भावराव लाेखंडे यांच्या कापसाच्या शंभर गाठी घेऊन मालमाेटार सिल्लाेडकडे येत हाेती. ट्रकला आग लागल्यानंतर चाळीस गाठी काढण्यात यश मिळाले, तर साठ गाठी जळाल्याने १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे लाेखंडे यांनी सांगितले. या आगीमध्ये जिनिंग मालकासह ट्रक मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अबब! लातूर महावितरणचे थकले तब्बल साडे सहा हजार कोटी रुपये
- विश्वास नांगरे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात हालचालींना वेग !
- प्रकरण अंगलट येताच अनिल बोंडेंनी पोलिसांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून घेतला यु-टर्न !
- सचिन वाझेंसह वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करण्याची मागणी नितेश राणे का करत आहेत ?
- सचिन वाझे यांच्याशी कनेक्शन जोडत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केलेले सरदेसाई कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

