Share

कोरोनाला लढा देण्यासाठी मनपा तयार, रुग्णांची गैरसोय होणार नसल्याचा दावा

Published On: 

औरंगाबाद : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. या रुग्णांसाठी टप्याटप्प्याने कोविड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. मनपाने लागेल तेवढी बेडची व्यवस्था करून ठेवली आहे.

या सुविधेत कोणतीही अडचण येणार नसल्याचे आयुक्त पांडेय यांनी मंगळवारी (दि.२) पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. पालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी लॉकडाऊनबाबत स्पष्ट केले की, संपूर्ण शहरात लॉकडाऊन केले जाणार नाही. ज्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे आणि ज्याठिकाणी जास्त गर्दी होत आहे अशां भागांमध्येच लॉकडाऊन केले जाईल. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मात्र तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. मास्कचा वापर सक्तीने करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळेच नागरिक मित्र पथकाकडून कारवाई होत आहे. मात्र अनेकांना याचा त्रास होतो.

कारण नियमांची अंमलबजावणी करवून घेणारा वाईटच ठरतो. तसेच मास्कचा वापर होत नसल्यामुळेच कोरोना रुग्ण वाढत असल्याने यावर आयुक्त पांडेय यांनी चिंता व्यक्त केली. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा व लॉकडाऊन टाळावा. असे आवाहन त्यांनी शहरातील नागरिकांना  केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!