सिंधुदुर्ग : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
दरम्यान, एका बाजूला राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरीही वास्तविक चित्र काही वेगळेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. दोन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर देखील भाष्य केलं होतं. ‘राजीनामा स्वीकारला आहे. तो राजीनामा फ्रेम करून भिंतीवर लावण्यासाठी नव्हता’ असं ते म्हटले होते. मात्र, अद्यापही हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही, असं आता समोर येत आहे.
२ दिवस झाले संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाही. त्यांचा राजीनामा घरी किव्हा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवलाय काय? २५ दिवस होत आले तरी FIR घेत नाही, राजीनामा मंजूर होत नाही, महाराष्ट्र हे विसरणार नाही.#ArrestSanjayRathod
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 3, 2021
याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘२ दिवस झाले संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सुद्धा त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला जात नाही. त्यांचा राजीनामा घरी किव्हा मंत्रालयात फ्रेम करायला ठेवलाय काय? २५ दिवस होत आले तरी FIR घेत नाही, राजीनामा मंजूर होत नाही, महाराष्ट्र हे विसरणार नाही.’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
- खास फीचर्सने ग्राहकांना आकार्षित करणाऱ्या रेनो किगरची डिलीव्हरी सुरु
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

