पुणे : समाज कल्याण आयुक्त यांच्या आखत्यारीत असलेल्या १६५ अनुसूचित जातीच्या आश्रमशाळा गेल्या २० वर्षापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी बिन पगारी काम करत आहेत. त्यामुळे दि. ३ रोजी बुधवार पासून समाजकल्याण आयुक्तालयासमोर विविध मागण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपोषण सुरू केले आहे.
शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा शिक्षकांच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. २४ ते २५ डिसेंबर दरम्यान झालेल्या गुणात्मक तपासणी अहवाल वर्गवारी करून मंत्रालयास पाठवणे, पदमान्यतेच प्रस्ताव उच्चाधिकार समितीकडे तात्काळ पाठवणे तसेच सेवेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देणे आणि शाहू, फुले, आंबेडकर नावाचे हेड तयार करून बजेट वर्ग होण्याबाबत सचिवकांडे शिफारस करणे व प्रचलित धोरणानुसार अनुदान देताना मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रत्येक वर्षी २० टक्के अनुदानाचा टप्पा ठरवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे अशा मागण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटने याच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील कर्मचारी उपोषणास हजेरी लावली. यावेळी संघटना अध्यक्ष शैलेश कांबळे, संदीप सूर्यवंशी, संतोष देशमुख, विजय गायकवाड, अविनाश काळे, अतिक अन्सारी, ज्ञानेश्वर राजुरे, धीरज अंजनिकर, शिवराज जाधव सह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील कर्मचारी उपोषणास हजेरी लावली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
- ‘तेरणा’ सुरू करण्यासाठी जनआंदोलन पेटणार, नेत्यांना गावबंदीचा इशारा
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- पंतप्रधानांना स्पीड पोस्टने पाठवल्या गोवऱ्या; गॅस दरवाढीचा निषेध
- औरंगाबाद मनपा भुंखडाचा वाद विधानसभेत; नगरविकास मंत्री शिंदे यांचा तथ्य नसल्याचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

