🕒 1 min read
पुणे : शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा गुवाहाटी येथील डायलॉग सर्वत्र फेमस होताना दिसत आहे. राजकीय नेते टीका करताना देखील त्या डायलॉगचा वापर करत आहेत. काय ते रस्त्यावरचे खडे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणी पट्टी वाढ, काय ती स्मार्ट सिटी, काय तो घोटाळा अश्या प्रकारचे बॉनर सद्या पुण्याच्या काही भागात झळकलेले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
पुणे महापालिकामध्ये ५ वर्ष भाजपची सत्ता होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजपला टोला लगावत ही बॅनरबाजी केली आहे.आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून त्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस तीनही पक्ष सत्ताधारी भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.
पुणे महापालिकेत भाजप सरकारने पाणीपट्टी, घरपट्टी यामध्ये वाढवलेले दर आणि रस्त्यावरचे अपुरे काम आणि खड्डे या विषयांवरुन भाजपवर टीका करण्यात आली आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेसने भाजपला चांगला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
