मुंबई : दिवसेंदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यानंतर आज दुपारी २ वाजता उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत पत्रकारांशी संवाद साधला. कायद्यानुसार शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळं याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे. यानंतर आता ठाकरेंच्या या वक्तव्यावर माजी मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, मातोश्रीचे दरवाजे आताच का उघडले आहेत, यावर मी काही बोलणार नाही. कारण शिवसेना आमदारांच्या भावना मी स्वतः ऐकून घेतल्या आहेत. शिवसैनिकांना भेटायला मिळतंय, हे एका दृष्टीने चांगलं आहे. मला असं वाटतंय की शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, तो सगळ्यांसाठी चांगल आहे. आता मातोश्रींचे दरवाजे उघडले काय किंवा नाही उघडले का? याच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. कारण यावर उद्या पुन्हा प्रेस कॉन्फरन्स होऊ शकते, असं सामंत म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या लाईव्ह नंतर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली या आहे. उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचं आहे की ज्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख टी बाळू असा केला, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा तुम्ही बसलात, तेव्हा आम्हाला, बाळासाहेबांना वरती काही वाटलं नसेल का. ज्या दाऊदनी बॉम्बस्फोट केला, अनेक हिंदू मारले. हजारो लोक मेले. त्याच्याशी संबंधित नवाब मलिकच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता तेव्हा आम्हाला काही वाटत नसेल का. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काय वाटलं, असं म्हणत आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या

