Share

Maharashtra Legislative Council : शिवसेनेनंतर काँग्रेसमध्ये भूकंप! विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाईची शक्यता

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीनंतर आता काँग्रेसमध्ये भूकंप झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत दलित नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव आणि काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या मुद्द्यावरून पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी गुरुवारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना बोलावून घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याने सोनिया गांधी प्रचंड नाराज आहेत. हंडोरे यांच्या पराभवाला जबाबदार असलेल्या 7 आमदारांवर कडक कारवाई होऊ शकते, असे मानले जात आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोन उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक चंद्रकांत हंडोरे होते, तर दुसरे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि मराठा नेते भाई जगताप होते.

हंडोरे प्रथम आणि जगताप द्वितीय असतील, असे काँग्रेस हायकमांडने निश्चित केले होते. असे असतानाही या निवडणुकीत हंडोरे यांचा पराभव झाला, तर जगताप विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस व्होट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हंडोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 29 जून रोजी महाराष्ट्र विधिमंडळात शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेसचे 10 आमदार गैरहजर होते. या आमदारांच्या बेजबाबदार वृत्तीवर सोनिया गांधींनीही नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडूनही अहवाल मागवला आहे.

याआधी बुधवारी चंद्रकांत हंडोरे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडोरे यांनी राहुल यांना विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाची माहिती दिली आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे प्रथम पसंतीचा उमेदवार असूनही निवडणूक कशी हरली हे त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!