चंद्रपूर : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीने मिळून 75 टक्के ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असा दावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धिम्या गतीने येत आहेत. पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केला आहे.
आज जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागत असून पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोव्हिन अॅपच्या बिघाडामुळे लसीकरणात अडचणी
- राधाकृष्ण विखेंच्या भाचीने राष्ट्रवादीच्या गडाला दिला हादरा; काकडीमध्ये भाजपची सत्ता
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामकरणातील योद्ध्यांचा आठवले करणार सत्कार
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी आक्रमक
- परभणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत झरीवर शिवसेनेचे वर्चस्व
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
