Share

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी आक्रमक

Published On: 

पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे विरोधी पक्ष भाजपाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं याबाबत संयमाची भूमिका घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, नैतिकता पाहत पक्षाने मुंडे यांच्यावर कारवाई केली नाही . त्यामुळे भाजपने आक्रमक होत, त्यांच्याविरोधात आज राज्यभर मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन केले. ‘हाय हाय सामाजिक न्याय, मंत्रीच करतात महिलांवर अन्याय, घोषणाबाज महाविकास आघाडी सरकार, मंत्रीच करतात महिलांवर अत्याचार,’ अशा घोषणा देत पुणे शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नेत्तृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे महिला आघाडी शहराध्यक्षा अर्चना पाटील, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्यासह अन्य नगरसेविका, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे नैतिकतेने राजीनामा देतील अशी अपेक्षा होती.परंतू,त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणून भाजपा महिला मोर्चा आज राज्यव्यापी आंदोलन करत आहे.त्यांनी निवडणूक आयोग व जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे,त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी खापरे यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!