Share

कोव्हिन अ‍ॅपच्या बिघाडामुळे लसीकरणात अडचणी

Published On: 

औरंगाबाद :औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाला शनिवार (दि.१६) पासून सुरुवात करण्यात आली. मात्र कोव्हिन अ‍ॅपमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने लसीकरण मोहीमेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता हे अॅपच बंद पडल्याने लसीकरण मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मंगळवारी (दि.१९) शहरातील पाच आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु होणार आहे. मात्र अद्याप अॅपमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्यामुळे ऑफलाईन पर्यायाची चाचपणी प्रशासनाने सुरु केली आहे.

लसीकरणासाठी कोव्हिन अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतरच लाभार्थ्यांना लसीकरण होणार असल्याने या अ‍ॅपची यात महत्वाची भूमिका होती. मात्र अ‍ॅपमध्ये वारंवार बिघाड झाल्याने लसीकरण मोहिमेवर याचा प्रभाव जाणवला. जिल्ह्यात शनिवारी प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे एकूण ४०० जणांना लस देण्याचे नियोजन होते. मात्र नोंदणी केले जाणारे कोव्हिन अ‍ॅप वारंवार बंद पडत होते. यामुळे नियोजित ४०० जणांऐवजी केवळ २१२ लाभार्थ्यांना लसीचा लाभ मिळू शकला आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या दिवशी शहरात पाच लसीकरण केंद्रांवर ५०० पैकी ३५२ लाभार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे तीन दिवस लसीकरणासाठी ठरवले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!