मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे या साठी सतत 16 वर्षे संघर्ष करणाऱ्या लढवय्या भीमसैनिक योद्ध्यांचा जाहीर सत्कार उद्या मंगळवार दि. 19 जानेवारी रोजी नामांतरासाठी पुढाकार घेणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
नामांतराच्या 27 व्या वर्धापन दिना निमित्त नामांतर लढ्यातील योद्ध्यांचा सरकार सोहळा घाटकोपर पूर्वेतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहिद स्मारक सभागृहत दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती रिपाइं चे महाराष्ट्र् राज्य उपाध्यक्ष डी एम चव्हाण, चिंतामण गांगुर्डे, राजाभाऊ गांगुर्डे, काका गौंगुर्डे, नंदू साठे यांनी दिली आहे.
नामांतर लढ्यातील योद्ध्यांचा सत्कार सोहळ्यात पँथरचे संस्थापक दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ, प्रा. अरुण कांबळे या दिवंगत मान्यवरांसह रिपाइंचे माजी राज्य मंत्री अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. नामांतराच्या 27 वा वर्धापन दिन साजरा करताना नामांतर योद्ध्यांचा सत्कार ज्या शाहिद स्मारकात होणार आहे त्याच्या प्रवेशद्वाराला शहीद पोचिराम कांबळे आणि शाहिद जनार्दन मवाडे यांचे नाव देण्यात आले आहे. तर विचारमंचाला शहीद गौतम वाघमारे यांचे नाव देण्यात आले आहे. नामांतर लढ्यातील सर्व योद्ध्यांचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; गावातील पराभवानंतर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- शेतकरी लाखोंचा पोशिंदा, मात्र केंद्र सरकार त्यांचा अपमान करतंय – अजित पवार
- घासून नाय, तर विरोधकांची ठासून !, काकोळी ग्रामपंचायतवर फडकला मनसेचा झेंडा
- जयंत पाटलांना सासुरवाडीने धोका दिला; म्हैसाळमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव !
- जनतेने महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला : नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
