Share

काँग्रेसचा राज्यसभेतील गोंधळ म्हणजे निव्वळ तमाशा : अतुल भातखळकर

Published On: 

मुंबई : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.

यानंतर या विधेयकावर संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे, तर विरोधकांनी नंतर प्रचंड गदारोळ करत हे विधेयक शेतकऱ्यांसाठी जीवघेणं ठरेल असा आवाज उठवत विरोध केला. एवढेच नाही तर, विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने स्वतःच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांना माल कोठेही विकण्याचे, निर्बंधमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते तोच पक्ष आज ही आश्वासने अंमलात आणणाऱ्या मोदी सरकारच्या या शेतकरी विधेयकाला विरोध करत आहे, असा निशाणा त्यांनी साधला. तसेच, काँग्रेसच्या घोषणापत्रात असलेल्या या विधेयकाला मोदी सरकारने आज कायद्यात आणल्यामुळे काँग्रेसने राज्यसभेत घातलेला गदारोळ हा निव्वळ द्वेषापोटी केलेला तमाशा आहे, अशी बोचरी टीका देखील त्यांनी केली आहे.

आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून या कायद्यांविरोधात देशभरातील २०८ शेतकरी संघटना २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करणार आहेत. किसान संघर्ष समितीचे नेते अजित नवले म्हणाले, ” बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारं, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारं, सरकारची जबाबदारी कमी करणारं आणि शेतीसह शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल आणि प्रक्रियादारांच्या दावणीला बांधणारी 3 विधेयकं केंद्र सरकारने मंजूर केले. त्यांचं आज कायद्यात रुपांतर झालं असं असलं तरी या कायद्यांना संबंध देशभरात प्रचंड विरोध होत आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!