Share

नगर-मनमाड महामार्ग दुरावस्थेच्या निषेधार्थ तरुणांनी केले मुंडण आंदोलन

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर-मनमाड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नगर-मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची पुरती वाट लागली आहे. रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर उतरून नगर-मनमाड महामार्ग कृती समितीच्या वतीने मुंडण आंदोलन करण्यात आले.

नगर-मनमाड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहतूक या मार्गावर सुरू असते. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून या खड्ड्याकडे स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काल सकाळी रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका केली. रोडवर पडलेल्या खड्ड्यात युवकांनी आपले डोक्याचे केस काढून मुंडण आंदोलन केले.

यावेळी वसंत कदम, प्रमोद विधाटे, सचिन तारडे, आशपाक सय्यद, अनिल वाणी, प्रभाकर खांदे, अजिंक्य कोळगे, नितीन मोरे आदींनी मुंडण केले. तर क्रांतीसेना पक्ष, मनसे राहुरी फॅक्टरी व अनेक सामाजिक संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला होता.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!