Share

‘विरोधकांनी किसानद्रोही असल्याचं सिद्ध केलंय’ ; भाजपच्या अवधूत वाघांचा टोला

Published On: 

मुंबई : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी ९.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.

यानंतर या विधेयकावर संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे, तर विरोधकांनी नंतर प्रचंड गदारोळ करत हे विधेयक शेतकऱ्यांसाठी जीवघेणं ठरेल असा आवाज उठवत विरोध केला. एवढेच नाही तर, विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.

भाजपच्या अवधूत वाघ यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी या विधेयकाच कायद्यात रूपांतर झाल्याने मोदी सरकारचे अभिनंदन करतानाच विरोधी पक्षांना शेतकरीद्रोही असल्याचा टोला लगावला आहे. “गरीब शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी येऊ घातलेल्या केंद्रीय कायद्याला विरोध करून आपण किसानद्रोही आहोत हेच विरोधी पक्षांनी सिध्द केले आहे.हर हर मोदी, घर घर मोदी, जय जय मोदी! ” असे ट्विट त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!