Share

“ज्या अटींवर संजय पांडे यांना…”, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मुंबई बँक घोटाळाप्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या अटीवर संजय पांडे यांना मुंबई पोलिस आयुक्त करण्यात आली आहे ती अट बहुदा ते पूर्ण करत आहेत’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा विधानसभेत केला होता. त्यानंतर आज दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबै बँकेची निवडणूक झाली त्यावेळी मजूर म्हणून प्रविण दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे दरेकरांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!