Share

प्रविण दरेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; नितेश राणे म्हणाले,“अपेक्षेप्रमाणे…”

Published On: 

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली असून अपेक्षेप्रमाणे पुढचे लक्ष्य प्रविण दरेकर, असेही ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात नितेश राणेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘अपेक्षेप्रमाणे…पुढचे लक्ष्य प्रवीण दरेकर. पांडे त्यांच्या मास्टर प्लॅननुसार खेळत आहे. याचा अंदाज आम्हाला आधीपासून आला होता.आम्ही प्रविण दरेकर यांच्या सोबत उभे आहोत. हम सब एक है’, असे नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रविण दरेकर म्हणाले की,‘सरकारविरोधात सातत्याने आवाज उठवल्याने सूड भावनेने गुन्ह्याची नोंद झाली असून अनेक दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याचे हे षडयंत्र सुरु आहे. परंतु हाती काही लागले नाही.’ तसेच भाजपवर दबाव आणून आपल्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईला ब्रेक लावता येईल का यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा दावाही दरेकर यांनी यावेळी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!