Share

प्रशासनाच्या दुर्लक्षाने लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठांची हाल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: बजाजनगर येथे दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गंत पंढरपूर जिल्हा परिषद शाळेत गुरूवार पासून लसीकरणास सुरूवात झाली. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने येथे कसल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने जेष्ठ नागरिक आदी नागरिकांना याठिकाणी येऊन हाल सोसावे लागत आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन दुसरा आणि महत्त्वपूर्ण टप्प्यास १ मार्र्चपासून संपूर्ण देशात सुरूवात झाली आहे. लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वेळ आहे. या प्रमाणे बहुतांश जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनी, दौलताबाद प्राथमिक केंद्राअंतर्गत पंढरपूर जिल्हा परिषद शाळेत लसीकरणासाठी केंद्रावर हजेरी लावत आहेत. यात जिल्हा परिषद शाळेतर्फे तीन खोल्या आरोग्य यंत्रणेेस वापरासाठी देण्यात आल्या आहेत. त्यात एका खोलीत नोंदणी, दुसऱ्या खोलीत लस, तिसऱ्या खोलीत लस घेतल्यानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली थांबविण्यात येते.

मात्र ग्रामपंचायतीच्या देखरेख असलेल्या शाळेतील सफाई कर्मचारी हे केंद्रावर साफसफाई करीत नसल्यामुळे येथील आरोग्य सेविका व डॉक्टर स्वत:च सर्व कामे करीत आहेत. लसीकरणासाठी जात असताना नोंदणी व्यवस्थित करूनच आणि संबंधित कागदपत्रांसोबत घेऊन, सुरक्षिततेचे नियम केंद्रावर पाळणे गरजेचे आहे. विशेष करून मास्क लावणे, सॅनिटायझरने हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र केंद्रावर सॅनिटायझर, स्वच्छता गृह, जेवणाची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच उन्हाचा पारा वाढत चालल्याने तहान लागत आहे. तरीपण केंद्रावर साधे पिण्यासाठी पाणी सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे वयोवृद्ध आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना लसीकरणासाठी जाऊन कोरोना होईल की काय अशी भिती निर्माण झाली.

सुविधा पुरविण्याचे काम हे ग्रामपंचायतीचे आहे. त्यांना कळविण्यात आले होते. मात्र कोणीही येथे आलेले नाही. यामुळे सुविधांची कल्पना नाही. ग्रामपंचायतिने सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या.
– डॉ. एस.पी. बामणे
(प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख)

केंद्र सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभागाने आम्हाला कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. साफसफाईसाठी कर्मचारी पाठवा असा फोन आल्यानंतर तत्काळ तेथे महिला कर्मचारी पाठवली होती. इतर कुठलीही मागणी करण्यात आलेली नाही.
रेश्मा शेख अक्तर, उपसरपंच

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!