मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१९ मध्ये एका गेमिंग कंपनीमध्ये विराट कोहलीने गुंतवणूक केली होती. विराट कोहलीने ज्या कंपनीत गुंतवणूक केली आहे तीच कंपनी बीसीसीआयची प्रमुख प्रायोजक आहे. यामुळे आता विराट कोहलीलाही लाभाच्या पदाचा फटका बसणार आहे.
विराट कोहलीने बंगळुरू येथील गॅलॅक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली होती. मोबाईल प्रीमियर लीग (एमपीएल) हा ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म हा याच कंपनीचा एक भाग आहे. 2018 साली सिंगापूरमध्ये या कंपनीची नोंदणी करण्यात आली. आता बीसीसीआयने 2020 साली टीम इंडियाचे कीट स्पॉन्सर म्हणून एमपीएला पसंती दिली.
बीसीसीआयने एमपीएलसोबत तीन वर्षांचा करार केला आहे. भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ तसेच 19 वर्षांखालील संघ यांना कीट स्पॉन्सर म्हणून एमपीएलसोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार बीसीसीआयला प्रत्येक सामन्यामागे 65 लाख रुपये मिळत आहेत. विराट कोहली एमपीएलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणूनही कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…ही आनंदाची गोष्ट, शिवसेना आता बंगालमध्ये मोठा रेकॉर्ड करेल’
- औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासाठी ठाकरेंचं केंद्राला पत्र
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- ‘लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटते’ ; शिवसेनेच्या अग्रलेखातून गांधी यांचे कौतुक
- डेविड वॉर्नरला बाद केल्यानंतर टीम इंडिया जोशात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

