औरंगाबाद : गतवर्षी ज्या वसाहतींमध्ये गतवर्षी कोरोनाचा संसर्ग गतीने पसरला होता. त्या वसाहतींत मात्र आता दुसर्या लाटेत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे पुन्हा या वसाहतींमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे, असा अंदाज मनपातील वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे. यावेळी रूग्ण वाढत असतांना नवीन वसाहतींतच कोरोनाचा संसर्ग अधिक पसरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी एप्रिल महिन्यानंतर औरंगाबाद शहरात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यात आरेफ कॉलनी, जलाल कॉलनी, असेफिया कॉलनी, किलेअर्क पंचकुंआ, नुर कॉलनी, किराडपुरा, यादव नगर, एन-४, सुरेवाडी, खडकेश्वर, नारळीबाग, औरंगपुरा, गुलमंडी, राजाबाजार, सिटीचौक, मिल कॉर्नर या प्रमुख वसाहती हॉटस्पॉट ठरल्या होत्या. ज्या वसाहतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते त्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना शहराच्या दुसर्या भागात ये जा करणे अशक्यप्राय होत होते.
या भागातील नागरिकांना वाळीत टाकण्यात आले होते. हॉटस्पॉट झोन जवळही अधिकारी-कर्मचारी येण्यास तयार नव्हते. आता पुन्हा एकदा शहरात गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट रुग्ण आढळून येत आहे. मात्र यंदा कोरोना संसर्गाने नवीन वसाहतींमध्ये शिरकाव केला आहे. मागील वर्षीच्या हॉटस्पॉट वसाहतींमधून आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ही अत्यंत समाधानाची बाब मानली जात आहे.
वैद्यकीय भाषेत हॉटस्पॉट वसाहतीमधील नागरिकांची हार्ड इम्युनिटीकडे वाटचाल झाली असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा त्या वसाहतींमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र संबंधित नागरिकांनी गाफील राहू नये. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन त्यांनी करणे आवश्यक आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला पाहिजे; दरेकरांची मागणी
- सायंकाळपर्यंत सरकार मधील आणखी एक मंत्री घरी जाईल :चंद्रकांत पाटील
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- ‘शर्जिल उस्मानीला महाविकास आघाडी सरकारचा आश्रय’
- शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे – जयंत पाटील


