🕒 1 min read
मुंबई : पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेमध्ये शर्जिल उस्मानीने आक्षेपार्ह वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. तरीही उस्मानीवर महाविकास आघाडी सरकार मेहेरबान आहे. त्याला आपल्या छायाछत्राखाली घेऊन विशेष वागणूक देत आहे अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शर्जिलचे वक्तव्य गंभीर असूनही कठोर कलमाखाली का गुन्हा दाखल केला नाही? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, शर्जिल उस्मानीच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्य सरकारने स्वतः हून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने उस्मानीवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची हिंमत दाखविली नाही. भाजपच्या आंदोलनानंतर उस्मानी विरोधात एफआयआर दाखल केला गेला.
उस्मानीने त्याच्या भाषणात घटनेचाही अवमान केला आहे. कायद्यानुसार अशा कृत्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मात्र, महाविकास आघाडी सरकारने राज्यघटनेचा अपमान ही मुकाट गिळला आहे असे केशव उपाध्ये म्हणाले. यावेळी उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि खा.संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. विधिमंडळ अधिवेशनात पाताळातूनही शर्जिल उस्मानीला खेचून आणू, अशी गर्जना करणारे मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचबरोबर हिंदूत्वाच्या डरकाळ्या फोडणारे संजय राऊत आता का गप्प आहेत? असा सवाल त्यांनी विचारला.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! पाणीपुरी, नुडल्स खाल्ल्याने चिमुकलीचा मृत्यू, ४० जणांना विषबाधा
- ‘राज्याच्या कामात केंद्राची विनाकारण ढवळाढवळ’, मंत्री अशोक चव्हाणांची टीका
- प्रेमा तुझा रंग कसा? पत्नीच्या निधनानंतर जालन्यात वृद्ध पतीची आत्महत्या
- प्रेमाचा करुण अंत! रेल्वेखाली उडी घेऊन युवक-युवतीची आत्महत्या
- राष्ट्रवादीचे बॅनर, ‘सब जगह से पड रही है मार, धन्यवाद मोदी सरकार!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
