Share

भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.

या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण व मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाचा एनआयएने तपास करावा अशी मागणी भाजपने केली होती. त्यानुसार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयए ला पाचारण केले.

दरम्यान, याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. सचिन वाझे प्रकरणाच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत आहे, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे.

एनआयए आमच्यासाठी नवी नाही !

‘पुलवामा घटेनाचा अजुनही रिपोर्ट एनआयए कडून आलेला नाही, का आलेला नाही? कोण होतं त्याच्या मागे? हे सगळे प्रश्न आहेत. मुंबई पोलिसांचं कौतुक संपूर्ण जगामध्ये केलं जातं. एनआयएचा वापर कशासाठी केला गेलेला आहे, या सरकारला महाराष्ट्राला कशाप्रकारे बदनाम केलं जातय, हे महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे एनआयए आमच्यासाठी काही नवीन विषय नाही. ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्यामुळे वाझे असो किंवा कुणी असो कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं भाष्य नाना पटोले यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!