कोल्हापूर : अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे.
परंतु या सर्व प्रकरणावर भाजपने मात्र महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले आहे. ‘पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील’ असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला.
पत्रकारांनी या मंत्र्याचे नाव काय असेल, असे विचारले असता वेट ॲन्ड वॉच असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. दरम्यान, या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडीवरुन राज्य् सरकारवर टीका केली. हे प्रकरण हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले असून सर्व पुरावे असतानाही सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
दरम्यान, सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या विरोधात त्यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांना उच्च न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांनी हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. त्यांना एनआयएने बेकायदेशीररीत्या अटक केली आहे, असा आरोप सुधर्म यांनी याचिकेत केला आहे. सुधर्म यांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल करून वाझे यांच्या अटकेवर हरकत घेतली आहे. वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात यावे आणि त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे – जयंत पाटील
- ‘शर्जिल उस्मानीला महाविकास आघाडी सरकारचा आश्रय’
- भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही – नाना पटोले
- महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणासाठी आनंद महिंद्रांची मोदींकडे ‘ही’ मोठी मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
