Share

शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे – जयंत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. शरद पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

आज सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली १२ संचालकांनी आणि अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ७२ दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पाटील बोलत होते. गायकर पक्षातून गेले होते असं कधी जाणवलं नाही. आज आनंद झाला आहे. मालकीच्या घरात आलात अशा अविर्भावात प्रवेश केला आहात. शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी करताच एकच हशा पिकला… कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली.

पश्चिम घाट योजनेचा फायदा अकोलेला होणार आहे. बंधारे बांधण्याचे काम करत आहोत. भाजपच्या काळात आंदोलन करुनही कामे झाली नाहीत ती कामे किरण लहामटे आमदार झाल्यावर करत आहेत. आपल्या घरात आला आहात. गायकर यांनी जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यामुळे तालुका मर्यादित न रहाता जिल्हाकडेही त्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगर जिल्हयात कॅनालची भरपाई खूप दिली आहे. आता अकोले विकासासाठी कटिबद्ध आहोतच परंतु नगर जिल्हाही महत्वाचा आहे. नगर जिल्हयात आता ताकद आणखी वाढणार आहे असेही जयंत पाटील म्हणाले. हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा असे जयंत पाटील यांनी सांगतानाच पिचड यांच्यावर काय अन्याय झाला अशी विचारणा केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे. आपल्यातील जीवाभावाचा नेता येतोय त्यामुळे आनंद वाटला आहे.त्यांच्या पाठिशी ताकदीने उभा राहण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असेही जयंत पाटील म्हणाले. पक्ष सोडला तर जनता धडा शिकवते हे अकोले तालुक्याने दाखवून दिले आहे. तुम्ही पुन्हा पक्ष प्रवेश करुन चुक केली नाही असे तुम्हाला वाटणार नाही. तुमची सर्व कामे मार्गी लावेन असा शब्द देत राष्ट्रवादीत पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे स्वागत केले.

आमदार डॉ किरण लहामटे, सिताराम गायकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार बाळासाहेब पाटील, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!