अहमदनगर:- मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांकडे लक्ष द्यावे. तसेच, निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामांसाठी मामांच्या (जलसंपदा मंत्री जयंत पाटील) मागे लागा अन्यथा तुमचा मामा होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची फिरकी घेत, या प्रश्नी मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे. असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वैभव पिचड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लहामटे यांनी विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला होता.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जुने सहकारी मधुकर पिचड यांना आपल्या खास शैलीत चिमटे काढले. काही लोक शरद पवार साहेबांना सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार वैभव पिचड आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला आहे.
अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे नात्याने मामा आहेत, त्यावरही अजित पवारांनी मिश्किल भाष्य केले.
महत्वाच्या बातम्या
- ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा
- कोवीड योध्यांना बसविले जमिनीवर; जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार
- खासदारांचा १०० कोटींच्या घोटाळ्याचा दावा, वक्फ बोर्ड जमिन प्रकरण
- ‘जलील यांच्याच घराखाली फायरिंग, चुकून निवडून आलेल्या खासदाराने शिकवू नये’
- पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल


