मुंबई : पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाहतूक कोंडीमधून लवकर बाहेर पडावं यासाठी कार चालकांनी चक्क पिस्तूलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.ज्या गाडीतून हे पिस्तूलधारी तरुण फिरत आहेत त्या गाडीच्या मागील काचेवर सत्ताधारी शिवसेनेचा लोगोही पहायला मिळत आहे. यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. भाजप नेते आमदार राम कदम यांनीही यावर भाष्य करत शिवसेनेवर तोफ डागली आहे.
हे महा आघाड़ी सरकार आहे की महा गुंडा़ सरकार ? शिवसेनेचे लोग रिव्हॉल्वर दाखवून लोकांना धमकावत आहेत. कधी पर्यन्त ही ह्यांची दादागिरी सहन करायची ? बस्स आता खूप झाले @OfficeofUT @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/od24k4kZvK
— Ram Kadam (@ramkadam) January 30, 2021
‘हे महा आघाड़ी सरकार आहे की महा गुंडा़ सरकार ? शिवसेनेचे लोग रिव्हॉल्वर दाखवून लोकांना धमकावत आहेत. कधी पर्यंत ह्यांची दादागिरी सहन करायची ? बस्स आता खूप झाले’ अशा आशयाचे ट्वीट करत कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ८७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली रणजी ट्रॉफी स्पर्धा
- कोवीड योध्यांना बसविले जमिनीवर; जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार
- खासदारांचा १०० कोटींच्या घोटाळ्याचा दावा, वक्फ बोर्ड जमिन प्रकरण
- तोंड दाबून बुक्याचा मार फक्त ग्रामीण भागानेच खायचा का? ग्रामस्थांचा सवाल !
- पिस्तूल दाखवून ओव्हरटेक करणाऱ्या कथित शिवसैनिकांचा व्हिडीओ व्हायरल


