Share

बेळगावला केंद्रशासित राज्य करा ! शिवसेना खा. विनायक राऊतांचे मोदींकडे साकडे

Published On: 

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.

आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा अशी मागणी केली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडले आहेत.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे असे ते म्हणाले होते आणि आता खासदार विनायक राऊत यांनी बेळगावला केंद्रशासित राज्य कण्याची मागणी थेट पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्यामुळे या सर्व प्रकरणाला वेगळेच महत्व आता प्रात्प झालेले आहे.

“अनेक वर्षांपासून कर्नाटकचे काही नेते अशाप्रकारचं राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही.” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना ठणकावलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!