अहमदनगर : भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील विनायक नरवडे, सुरज गुंजाळ, विकास पालवे आणि अभिषेक दुधाळ या चार मुलांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
विनायक नरवडे
अहमदनगरच्या विनायक नरवडे याने या परीक्षेत 37 वी रँक मिळवला आहे. विनायक हा दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाला. विनायक याने पुणे येथे इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अमेरिका येथे जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथेच एक वर्ष जॉब सुद्धा केला होता.
सुरज गुंजाळ
नवनागापूर येथील सुरज गुंजाळ याने 353 वी रॅंक मिळवला आहे. सुरजने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. सूरजने सिंहगड कॉलेज पुणे येथून इंजिनिअरिंग पूर्ण केले असून, तो युपीएससीची तयारी करत होता.
अभिषेक दुधाळ
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दुधाळ याला 469 वी रॅंक मिळावला आहे. मुंबई येथील व्हीजेटीआय कॉलेजमधून त्याने बी. टेक केले आहे. अभिषेक पहिल्याच प्रयत्नात 2019 मध्ये उत्तीर्ण झाला होता. तेव्हा तो इंडियन रेल्वे ट्रॉफिक सर्व्हिसेसमध्ये कार्यरत झाला. त्यानंतर देखील न थांबता त्याने अभ्यासात सातत्य ठेवून पुन्हा परीक्षा देऊन त्याने यश मिळवले.
विकास पालवे
नेवासे तालुक्यातील सोनई येथील विकास पालवे याने 587 वी रँक मिळवला आहे. चार वर्षांपासून युपीएसची परीक्षेची तयारी करीत होता. चौथ्या प्रयत्नात त्याला या परीक्षेत यश मिळाले आहे. पुण्यातील व्हीआयटी येथून विकास याने 2016 मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी केली होती.
यशस्वी उमेदवारांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देखील यशस्वी उमेदवारांना ट्विट करत शुभेच्छा दिल्याअ आहेत. दरम्यान, नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील शाळा सुरु होणार ? महापौर पेडणेकर यांनी दिली ‘ही’ माहिती
- ‘जर त्या परीक्षार्थींची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर ?’ राणेंचा प्रहार
- ‘आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, तेव्हा…’; फडणवीसांच्या विधानामुळे चर्चांना उधाण
- सावधान ! पुढच्या सहा तासात चक्रीवादळाचा धोका; तर राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता
- वय वर्ष २१ आणि मेहनीतीची पराकाष्टा! मध्यमवर्गीय कुटुंबातील नितीशा जगतापनं UPSC केली क्रॅक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

