Share

‘आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, तेव्हा…’; फडणवीसांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : राज्यात महाविकास आघडीचे सरकार आल्यापासून सर्वाधिक जागा मिळून मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. भाजपने वारंवार हे सरकार आपापसांतील वादाने हे सरकार पडेल असा दावा केला आहे. तर, काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडी सरकारबाबत अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. ते मुंबईतील माथाडी कामगारांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ‘आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही,’ असं विधान फडणवीस यांनी केलं आहे. यामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस म्हणाले, ‘माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते. या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत,’ असं भाष्य फडणवीस यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!