Share

‘जर त्या परीक्षार्थींची आडनावे ठाकरे, पवार, थोरात असती तर ?’ राणेंचा प्रहार

Published On: 

मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय.

परीक्षार्थी हे घरातील आर्थिक स्थिती बेताची असताना एसटी, रेल्वे यांचे तिकीट काढून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, रस्त्यात असताना अचानक परीक्षा रद्द झाल्याचे टोपे यांनी जाहीर केल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्यासह परीक्षेसाठी घेतलेली मेहनत देखील वाया गेली आहे. ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल असं जरी सांगण्यात आलं असलं तरी आता निर्माण झालेलं मानसिक दडपण, आर्थिक नुकसान याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1441657019073662978?s=20

तर विरोधकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी एका परीक्षार्थीचा व्हिडीओ शेअर करत त्यांचा संतप्त भावनांना वाट मोकळी करून देत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. याला निर्लज्ज महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. जर यांची आडनावे ठाकरे पवार आणि थोरात असती तर त्यांच्याबाबत असं झालं असतं का? असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे. यासोबतच, ‘आरोग्य विभागाच्या परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी लांबून स्वखर्चाने आले होते. तो काही महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घरी असलेला वसुलीचा पैसा नव्हता,’ असा घणाघात देखील नितेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!