Share

वय वर्ष २१ आणि मेहनीतीची पराकाष्टा! मध्यमवर्गीय कुटुंबातील नितीशा जगतापनं UPSC केली क्रॅक

Published On: 

लातूर : भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यातच मुळची लातूरची असलेली नितीशा जगताप हीचं सर्वात जास्त कौतुक होत आहे. नितीशाने  अवघ्या 21 व्या वर्षी UPSC परीक्षा क्रॅक केलीय. अनेक जणांना 21 व्या वर्षी भविष्यात काय करायचे हे देखील माहित नसते. तर या लातूरच्या ताईने 21 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांना सोमोर एक आदर्श निर्माण केलय.

नितीशाची घरची परिस्थिती बघता फार काही बरी नाही. नितीशाचे वडील एलआयसी एजंट तर आई गृहिणी आहे. पण नितीशाला लहान पासूनच शिकण्याची तसेच काही तरी मोठं करून दाखवण्याची इच्छा होती. तसेच तिला लहापानापासूनच शिक्षणाची जिद्द होती. भविष्यात  अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं. तिच्या या स्वप्नांना आई वडिलांनी खतपाणी घातलं.

केवळ नितीशाच्या शिक्षणासाठी तिची आई तिच्याबरोबर पुण्यात राहायला आली. नितीशाला योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच तिचं भविष्य उज्वल व्हावं यासाठी फक्त तिनेच नव्हे तर तिच्या कुटूंबियांनी देखील तिची तेवढीच साथ दिली. पण या ताईने देखील आपल्या कुटुंबाचे कष्ट लक्षात घेत  अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सारखी सर्वात कठीण परीक्षेत यश मिळवलं.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यलयातून शिक्षण घेत तिने दुसऱ्या वर्षापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. तिने तिच्यासाठी फक्त चार वर्ष दिली होती. त्या चार वर्षात तिने पूर्ण प्लॅन करुन अभ्यास केला. आणि अपेक्षित यश मिळालं. ताईच्या या यशाचं कौतुक सर्वानांच आहे तसेच तिच्या या यशामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!