औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशने जालना रोडवर हायकोर्ट चौकात स्मार्ट सिग्नल कार्यान्वित केले आहे. अशाच प्रकारचे सिग्नल शहरातील इतर भागात बसविले जाणार असून, या सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरे जोडले जाणार आहेत. वाहतुकीचा अंदाज घेऊन सिग्नलचा वेळ कमी जास्त होईल, अशी यंत्रणा देखील या सिग्नलवर राहणार आहे. सध्या असलेल्या सिग्नलवर पादचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी पुरुषाचे सिम्बॉलीक चित्र येते. मात्र नवे स्मार्ट सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर त्यावर महिलेचे चित्र दिले जाईल. यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा मनपाचा प्रयत्न असेल.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने वरळीच्या धर्तीवर हायकोर्ट चौकात स्मार्ट सिग्नल कार्यान्वित केले आहे. सिग्नलच्या कमानीसारख्या पोलला एलइडी दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकाला सुमारे दीडशे मिटर लांबूनच वाहतूक सिग्नल कळते.
त्यामुळे तो वाहनाची गती कमी करेल व पर्यायाने अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. असेच स्मार्ट सिग्नल जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास व व्हीआयपी रोडवर बसविण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे.
यासंदर्भात पांडेय म्हणाले, सध्या शहरात असलेले वाहतूक सिग्नल जुने झाले आहेत. त्यामुळे महापालिकेला देखभाल दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे आधुनिक पद्धतीचे स्मार्ट सिग्नल शहराच्या इतर भागात उभे केले जातील. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने एमएसआय प्रकल्पाअंतर्गत शहरात ७५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
हे कॅमेरे सिग्नलला कनेक्ट असतील. तसेच इंटीग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असेल. म्हणजेच सिग्नलवर गाड्या थांबण्याचा वेळ ट्रॅफिकच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त होईल, असे पांडेय यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्याच्या चिंचखेड्यात अवैध दारू विक्री; महिलांचे दिसले रौद्र रूप
- धक्कादायक! उसाचा फड पेटवला; शेतकऱ्याचा झोपेतच होरपळून मृत्यू
- घाबरू नका, प्रशासन सज्ज आहे; जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा
- परभणी जिल्ह्यात न्यायाधीशांना कोरोनाची लागण
- महिला रुग्णांलयातील चित्रीकरण करणाऱ्या ‘त्या’ हौसी पत्रकारा विरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

