हिंगोली :मोबाईलमुळे आयुष सुखद झाले आहे. त्यामुळे आयुष्याच्या महत्वाच्या घडामोडी आपल्याला कैद करता येतात. मोबाईल हा एक परिपूर्ण आणि आवश्यक घटक बनला आहे. मोबाईलचा वापर जसा चांगल्या कामासाठी होत असतो तसा वाईट कामासाठी होऊ शकतो. असाच गैरवापर हिंगोलीच्या एका हौसी मोबाईल पत्रकाराने केला आहे. त्याला महिला रुग्णालयातील प्रसुतीगृहातील चित्रीकरण करणे चांगलेच महागात पडले आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांच्या तक्रारीवरुन वैद्यकीय सेवेत अडथळा आणला म्हणून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत येथील दिनेश कुलकर्णी यांनी मागील तीन दिवसांपासून परवानगी न घेता महिला रुग्णालयात जाऊन रुग्णालयातील प्रसुतीगृहात अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या महिला रुग्णांचे चित्रीकरण केले. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाने थैमान घातले असून रुग्ण संख्येतही वाढ होत आहे.स्मार्ट मोबाईलचा फायदा घेत अनेक हौशी पत्रकार व्हिडिओ चित्रीकरण करीत ब्लँकमेलींगचा व्यवसाय करीत आहेत. परंतू सोशल मिडियाच्या नावाखाली त्यावर पांघरुण पडत आहे. सदरील गुन्हा दाखल झाल्याने मात्र काहीअंशी या प्रकारावर अंकुश बसेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीकाकडून व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत योग्य ती खबरदारी व परवानगी न घेता सतत तीन दिवसापासून सदरील इसम त्रास देत असून वैद्यकीय सेवेत अडथळा आणत आहे. महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक पुरुषोत्तम भोरगे यांच्या तक्रारीवरुन आरोपी दिनेश कुलकर्णी याच्याविरुद्ध रविवार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात पावसामुळे पीकांना बसला चांगलाच फटका; शेतकरी हवालदिल
- परभणी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा; पीके भूईसपाट
- लातूर एमपीएससीच्या परीक्षेला अडीच हजार परीक्षार्थींची पाठ
- धक्कादायक! आरोपीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
- तेंडुलकर आणि ब्रायनची अॅक्टींग पाहून युवराज म्हणतो, Oscar Nomination!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

