जालना: जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात चिंचखेडा येथे गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूची विक्री होत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. गावात अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केलेली असतानाही दारूची सर्रास विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे येथील महिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आणि या रौद्र रूप धारण केलेल्या महिलांनी दारूचे बॉक्स फोडून टाकले.
गावात होणारी अवैधरीत्या दारू विक्री बंद व्हावी यासाठी सरपंच जी. यू. सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच गावात ग्रामसभा घेण्यात आली. या यासंदर्भातील सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. गावातील महिला व पुरुषांच्या सह्या घेऊन जाफराबाद पोलिस स्टेशनला जाऊन चिंचखेडा येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी असे निवेदन देण्यात आले त्याचसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील दारूबंदी विभागालाही निवेदन दिले असल्याचे सरपंच सरोदे यांनी सांगितले. मात्र अनेकदा निवेदने देऊन या निवेदनांची कुणीच दखल न घेतल्याने शुक्रवारी सायंकाळी गावात विक्रीसाठी आलेल्या अवैध दारूचे खोके बघून गावातील दहा ते बारा महिला संतप्त झाल्या. आक्रमक होत त्यांनी ते दारूचे खोके आणि त्यातील बाटल्या दगडांनी चुरा केल्या.
यापुढे गावात कुणीच अवैध दारू विक्री करणार नाही, अशी सक्त ताकीद त्यांनी यावेळी दिली. यानंतर गावात कुणी दारू पिणारे तथा विक्री करणारे आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही या महिलांनी दिला. गावात दारूबंदी व्हायलाच पाहिजे असा संकल्प चिंचखेडावासीय नारीशक्तीने केला.
महत्वाच्या बातम्या
- एकवीस वर्षीय महिलेची आत्महत्या
- ‘आता दिशाभूल कोण करतंय ?’ पवारांचा ‘तो’ दावा फडणवीसांनी पुराव्यासकट खोडून काढला
- परमवीरसिंग यांनी कटकारस्थान करुन गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय ?
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- जिल्हा व सत्र न्यायालयाची केली फसवणूक, गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
