बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गाढ झोपेत असलेल्या शेतकऱ्यावर काळाने घात केला. ऊसतोडणी होऊन ऊस गाळपास गेल्याने पेटवून दिलेल्या फडात झाेपलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील जातेगावमधील श्रीराम वस्ती येथे शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. दिगंबर विक्रम पांढरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
शुक्रवारी दिगंबर पांढरे हे गेवराई येथील रोजंदारीचे काम करून रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आला आणि ते घराबाहेर पडल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगंबर यांचा मृतदेह जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी आढळून आला.शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला असताना हा प्रकार घातपाताचा असून खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता.
त्यामुळे तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे घटनास्थळी हजर झाले होते. दिगंबर यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन महिन्यांचा मुलगा आहे. याप्रकरणी मृत दिगंबर यांची आई सोजरबाई पांढरे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलिसांत काकासाहेब किसन जाधव व राम किसन जाधव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासात नेमका प्रकार स्पष्ट होईल असे तपासाधिकारी यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- सगळे नियम फक्त जनतेसाठी…? अजित पवारांच्या बैठकीत कोरोनाचे नियम तुडवले गेले पायदळी
- एटीएसच्या करेक्ट कार्यक्रमावर शरद पवार खुश, म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

