Share

मुख्यमंत्र्यांचा शहजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा; भाजप नेत्याची विखारी टीका

Published On: 

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विविध राज्यांचे दाखले देत देशातूल महिला अत्याचारांचा लेखाजोखाच मांडला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. यासोबतच, राज्यपालांची भूमिका ही सरकारविरोधी लोकांशी सुसंगत असून हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

यासोबतच, गुजरातमधील स्थिती पाहता गुजरात विधानसभेत एक महिन्याचे विशेष अधिवेशनच बोलावावे लागेल. तसेच, हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी मा. राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लगावला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर भाष्य करून गांभीर्य मांडण्याऐवजी इतर राज्यांची उदाहरणे दिल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. ‘राज्यात दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून शक्ती कायदा तातडीने मंजूर करायला हवा. प्रत्येक वेळा आलं अंगावर ढकल केंद्रावर ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य नाही,’ अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘पुणे आणि साकिनाक्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राज्यपालांच्या सुचनेकडे गंभीरपणे न पाहता ‘मोदी-शहांना चार दिवसाचे अधिवेशन बोलवायला सांगा’, हा मुख्यमंत्र्यांचा शहजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा आहे,’ असा घणाघात अतुल भातखळकर यांनी करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!