नवी दिल्ली : राज्यात गेले ५ महिने कोरोनाने कहर घातला असतानाच मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात नसून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कोरोनाची परिस्थितीवरून त्यांनी राज्य सरकारवर घणाघात करत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी लोकसभेत केली आहे. ‘कोरोना काळात खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची लाखो रुपयांनी लूट होत आहे. ही खाजगी रुग्णालयात होणारी लूट थांबविण्यासाठी आकस्मिक कायदा लागू करावा, विदर्भात ऑक्सिजनची कमतरता आहे. अनेकांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमवावे लागले आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या निवासस्थानी असलेल्या ‘मातोश्री’वर बसून फुकटचे सल्ले देत आहेत. त्यामुळे केंद्राने महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी’, खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्यांकडे केली आहे.
‘महाराष्ट्र सरकारने खाजगी दवाखाने मर्यादा 10 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर करावी, पीएम फंडमधून महाराष्ट्र, विदर्भाला भरीव मदत करावी’ अशी मागणीही नवनीत राणा यांनी लोकसभेत केली.
महत्वाच्या बातम्या :-
- …अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ : आ. गोपीचंद पडळकर
- आयसीयूमधील व्हेंटिलेटरच्या स्थितीवर संसदेत गाजला हा मुद्दा
- मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाचा आदेश कृष्णकुंजवरून देण्यात आला होता
- यवतमाळच्या डॉक्टरांनी द्यावा खचलेल्या रुग्णांना मानसिक आधार, या मंत्र्यांचे आवाहन
- ‘या’ अंबानगरीत गर्भवती डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू


