Share

आयसीयूमधील व्हेंटिलेटरच्या स्थितीवर संसदेत गाजला हा मुद्दा    

Published On: 

नागपूर : देशात दररोज ९0 हजारांवरून अधिक कोरोना रुग्ण बाधित होत असून, मृत्यूचा आकडाही दोन हजारांच्या वर आहे. कोरोनावर उपचारासाठी असलेले बेड्सची संख्या कमी आहे. देशात केवळ ३२ हजार ४0९ व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. ही संख्या अपर्याप्त असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आयसीयूमधील व्हेंटिलेटर बेड्सची संख्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत केली.

तुमाने यांनी लोकसभेत देशात कोरोना रुग्ण संख्या, उपचार व सरकारकडून केल्या जाणार्‍या उपाय योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला. देशात कोरोनाबाधित व्यक्तीवर उपचारासाठी १५ हजार ३६0 कोविड उपचार केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यात विना ऑक्सिजनचे साधे १३ लाख २0 हजार ८८१ आयसोलेटेड बेड्स आहेत. याशिवाय २ लाख ३२ हजार ५१६ ऑक्सिजन बेड्स असून, आयसीयुमध्ये उपलब्ध असलेल्या ६३ हजार १९४ बेड्सपैकी केवळ केवळ ३२ हजार ४0९ बेड्ससोबत व्हेंटिलेटर जोडलेले आहे. व्हेंटिलेटर बेड्सची संख्या खूपच कमी आहे.

सरकारने जास्तीत जास्त व्हेंटिलेटर निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्हेंटिलेटरची संख्या सरकारी रुग्णालयात वाढविल्यास यामुळे कायमस्वरूपी उपचार यंत्रणा विकसित होईल, भविष्यात याचा फायदा देशातील आरोग्य व्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल, असेही तुमाने म्हणाले.

केंद्राकडून महाराष्ट्राला १ हजार ६११ कोटीकोविड महामारीवर नियंत्रणासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने राज्य आपत्ती निवारण निधी सर्व राज्यांना ११ हजार ५६५.९३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून महाराष्ट्राला १ हजार ६११ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय राज्याच्या जीडीपीच्या २ टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महाराष्ट्राला १५ हजार ३९४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची मान्यता देण्यात आल्याची माहिती तुमाने यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!