अमरावती : देशात कोरोना योद्धा म्हणून अनेकांची भूमिका मोलाची राहिली. मात्र केवळ व्यवस्थेच्या कामतरतेमुळे काहींचा जीव देखील धोक्यात आला. अमरावतीत नुकत्याच घडलेल्या अशाच एका घटनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. आरोग्य सेवा देताना कोरोनाची बाधाझालेल्या एका गर्भवती मातेचा प्राण गेला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. डॉ. प्रतिक्षा वालदेकर असे त्यांचे नाव असून, त्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागात कार्यरत होत्या.
सात महिन्याच्या गर्भवती असलेल्या डॉ. प्रतिक्षा वालदेकर या नोकरीसोबत इर्विन रुग्णालयाच्या पॅथालॉजी विभागामध्ये सेवा द्यायच्या. तेथेच कार्यरत असतांना त्या कोरोना संक्रमीत झाल्या. सुरुवातीला त्यांच्यावर अमरावतीत उपचार करण्यात आले. प्रकृती अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. त्यांच्यावर नागपूरच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून समाजमनही सुन्न झाले आहे. कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावाच्या डॉ. प्रतिक्षा यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- भिवंडीतील इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर
- माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरभर राबवा- बाळासाहेब थोरात
- …अन्यथा धनगर समाज आणि सरकार हा संघर्ष अटळ : आ. गोपीचंद पडळकर
- आयसीयूमधील व्हेंटिलेटरच्या स्थितीवर संसदेत गाजला हा मुद्दा
- मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाचा आदेश कृष्णकुंजवरून देण्यात आला होता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

