मुंबई : लालबाग येथील ‘मुंबईचा राजा’ची विसर्जन मिरवणुक आज काढण्यात आली होती. त्यावेळी मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याने पोलिसांनी ही मिरवणूक आडवली होती. तसेच पुण्यातील चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरु असताना पोलिसांनी या मंडळाचे ढोल-ताशे जप्त केले आहेत. यावर भाजपा नेते आ. अतुल भातखळकर यांनी संतप्त टीका करत ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘शरिया’ लागू करणे बाकी ठेवले आहे’ असे ट्विट केले आहे.
अतुल भातखळकर यांनी मिरवणूक अडवण्यात आल्याची एक बातमी ट्विटरवर शेअर केली आहे, ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे’. असे ट्विट भातखळकर यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे… pic.twitter.com/rlh9ChaZ86
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 19, 2021
यंदा कोरोनाची तीसरी लाट येण्याची धास्ती प्रशासनाला असल्याने राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तसेच संशयित दहशतवादी पकडल्यामुळे हल्ले होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे मुंबईसह प्रसिद्ध गणपती मंडळांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी मंडळांना ऑनलाईन दर्शन, मर्यादीत जणांना मुखदर्शन अशा उपायांचा अवलंब करण्यास सुचविले होते. मात्र तरीही लालबागचा राजा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत मोठी गर्दी आढळून आल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी हि मिरवणूक थांबवत गर्दी न करण्याचे अवाहन भक्तांना केले. त्यानंतर काही वेळाने ही मिरवणूक पुन्हा विसर्जनासाठी रवाना झाली.
त्यानंतर दुसऱ्या घटनेत पुणे येथील मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक पोलिसांनी थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत. या घटनेवरही अतुल भातखळकरांनी ट्विट केले. खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही. असे अतुल भातखळकर म्हणाले.
पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत.
खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही. pic.twitter.com/xHCoBGj30q— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 19, 2021
‘पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केले आहेत. खंडणी सरकारच्या या दडपशाहीचा हिशोब चुकता केल्याशिवाय जनता रहाणार नाही.’ असे दुसरे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचे अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुक
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

