मुंबई : सोनी मराठी या वाहिनीवरील विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील सर्वच कलाकारांच्या कामाचे कौतुक केले जाते. नुकतेच महाराष्ट्राची हास्यजत्राच्य संपूर्ण टीमने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आहे.
https://www.instagram.com/p/CT_ek3XKYoN/?utm_medium=copy_link
या भेटीदरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मिडीयावर शेअर करण्यात आले आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण टीमचे कौतुक करत म्हणाले, ‘तुम्ही लोकांना हसवण्याचं अतिशय कठीण असं काम करत आहात. ते सतत असंच करत राहा’, तसेच हा शो ते पाहत असल्याचे देखील सांगितले.
आता लवकरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २० सप्टेंबरपासून, सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा. असे चार दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ता माळी सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूचसंचालन करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातील सचिन वाझे कोण’?, भाजपचा सवाल
- मुख्यमंत्रिपदासाठी सोनिया गांधींकडून अंबिका सोनींना हिरवा कंदिल; मात्र आता सोनींचाच नकार
- ..म्हणून ‘माजी’ म्हणू नका; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्याचा खुलासा
- ‘मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी मला सॉरी म्हणाल्या’, कॅप्टन अमरिंदर यांचा दावा
- भाजपचे लोक एक दिवस मराठी माणसालाच मुंबईतला परप्रांतीय ठरवतील- संजय राऊत


