🕒 1 min read
पंढरपूर : टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर करत व रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस १० मानाच्या पालख्या घेवून निघाल्या आहेत. तर आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही वेळापूर्वीच वखारी येथे पोहचली आहे. संत मुक्ताई पालखी, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यानं पहाटेचं पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे.
दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्क्मिनीची शासकीय पूजा करण्यात येत असती. पूजा करण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह सोमवारीच पंढरपूरला रवाना होणार आहे. विशेष म्हणजे ते स्वत: गाडी चालवित पंढरपुरात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.याआधिच्या पुजेला सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गाडी चालवत मुंबई ते पंढरपूर असा दोन्ही साईडचा प्रवास केला होता. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता.
दरम्यान दरवर्षी शेकडो दिंड्या, पालख्यांसोबत हजारो वारकरी पायी वारी करत पंढरीत दाखल होत असतात. पण यंदा कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी निघालेली नाही.. त्यामुळे मानाच्या १० पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत ४० वारकऱ्यांना परवानगी आहे. पण त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर जाणार’ ; अनिल देशमुखांनी दिली माहिती
- अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
